Mamachi Wadi

Welcome to Mamachi Wadi.


Why Vasai : 



 निसर्गसंपन्न वसई 
मुंबई जवळ असलेल्या निसर्गसंपन्न वसईत ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक महत्वाची अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. येथे ऐतिहासिक किल्ले आहेत, प्राचीन धार्मिक स्थळे आहेत, स्वच्छ समुद्रकिनारे आहेत, पोर्तुगीजकालीन सुंदर चर्च आहेत, हिरवेगार फळा-फुलांचे, भाज्यांचे मळे आहेत. छोटे-मोठे असे अनेक तलाव आहेत.

वसईतील ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण म्हणजे वसईचा किल्ला. तब्बल २०५ वर्षे हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. नरवीर पेशवे चिमाजी अप्पांनी १७३९ साली पोर्तुगीजांवर मात करून हा किल्ला मिळवला. या किल्ल्यात त्याकाळी एकूण सात चर्च होती, त्यातील पाच आजही पहावयास मिळतात, येथे अत्यंत प्राचीन असे नागेश्वर मंदिर आहे, ज्याचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. त्याच्या शेजारीच चिमाजी अप्पांनी किल्ला जिंकल्यावर बांधलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिर (किल्ल्यातील) आहे. किल्ल्याच्या सागरी दरवाजाकडे चिमाजी अप्पांनी बांधलेले मारुतीचे मंदिर आहे. येथील मारुतीच्या मूर्तीचा चेहरा मानवी असून त्यास कोरीव मिशा आहेत तसेच डोक्यावर पेशवाई पगडी आहे. किल्ल्यात चिमाजी अप्पांचे अलीकडे बांधलेले भव्य स्मारक आहे.

तसेच वसईतील चारी बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेला अर्नाळ्याचा किल्ला. येथे आपल्याला बोटीने जावे लागते. चारी बाजूने खाऱ्या पाण्याने वेढलेले असूनही येथील विहिरीतील पाणी गोडे पिण्यायोग्य आहे, हे येथले वैशिष्ट्य.

असेच चारी बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेले वसईतील आणखीन एक बेट म्हणजे पाणजू बेट. येथेही आपल्याला बोटीने जावे लागते. स्वातंत्र्य संग्रामात या गावाने २१ स्वातंत्र्यसैनिक दिले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक स्वातंत्र्यसैनिक देणारे हे गाव. त्यावेळेस या गावाची लोकसंख्या अवघी ३०० होती म्हणजेच ४० ते ५० कुटुंबे. या गावालगतच्या समुद्रात केएमसी हॉलिडेज येत्या काही दिवसात पर्यटकांना सुसज्ज अशा बोटीतून जलप्रवासाचा आनंद देणार आहे.

वसईतील आणखीन एक महत्वाचे ठिकाण म्हणजे भगवान परशुरामांनी निर्माण केलेल्या श्रीक्षेत्र निर्मळ येथील पाचवे जगद्गुरू आद्य शंकराचार्य विद्यारण्य स्वामी यांची समाधी असलेले जवळ-जवळ २५०० वर्षे जुने मंदिर. या मंदिराचाही जीर्णोद्धार पेशव्यांनी केला होता. या मंदिरा शेजारीच भगवान परशुरामांनी तयार केलेले भलेमोठे निर्मळ व विमल तलाव आहेत. येथून एक किलोमीटर अंतरावर वाघोलीचे प्रती शनी शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध पावलेले सुरेख शनी मंदिर आहे. येथील रम्य परिसर आपले मन मोहून टाकतो. तसेच येथून काही अंतरावरील एका छोट्या टेकडीवर वसलेले सुरेख दत्तमंदिर. येथून आपल्याला संपूर्ण वसईचे व वसईच्या पूर्ण समुद्रकिनाऱ्याचे सुरेख दर्शन घडते.

तसेच वसईतील नालासोपारा येथील प्राचीन बौद्ध स्तूप. या स्तूपाचे उद्घाटन भगवान गौतम बुद्धांनी केले होते. सदर स्तुपास सम्राट अशोकानेही भेट दिली होती. या स्तुपाची हुबेहूब प्रतिमा म्हणजे मध्यप्रदेशातील सांची येथील स्तूप होय. सदर स्तूपाचे व परिसराचे नुतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येत असून ते आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनवण्याचा महापालिकेचा मानस आहे.

वसईत गोव्या प्रमाणेच अत्यंत सुंदर अशी अनेक पोर्तुगीजकालीन चर्च आहेत. तसेच भुईगाव, रानगाव, कळंब, राजोडी, नवापूर, अर्नाळा असे सुंदर समुद्रकिनारे आहेत.

वसईच्या पूर्व पट्टयात वज्रेश्वरी, गणेशपुरी, नैसर्गिक गरम पाण्याची कुंडे, उसगाव, पेल्हार धरणे आहेत. जीवदानी देवी मंदिर आहे. येथे आता रोप-वेनेही जाता येते. तसेच तुंगारेश्वर येथील सदानंद महाराजांचा आश्रम व सुरेख असे स्वयंभू महादेव मंदिर. येथे जाताना आपल्याला ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.

वसईच्या पूर्व पट्ट्यातील आणखीन एक महत्वाचे प्राचीन ठिकाण म्हणजे डोंगराच्या कुशीत वसलेले ईश्वरपुरी. येथे श्रीकृष्ण, बलराम, सुदामा यांचे गुरु ऋषी सांदिपनींचा आश्रम होता. श्रीकृष्ण, बलराम, सुदामा हे येथे शिक्षणासाठी राहिले होते. येथे सांदिपनी ऋषींची समाधी आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेले महादेव मंदिर आहे.



About Vasai video

Our Concept : 


As when we are child we all like to visit our Mama's ( Uncle) Place in most of Summer Vacation. By keeping that sprite in mind we have Design this entire package of Mamachi Wadi ( Uncle's Farm House).


We offer you a Amazing one day experience which will make Impression on your mind for life time. 


Your Day start with the Darshan of 


Shri Shani Deva at Wagholi, 

Shari Shani Mandir Wagholi
after Darshan a hot Tea and coffee with traditional snacks like Kanda Poha, Upma, Shira Etc.

A Group Enjoying Morning Breakfast 
after this refreshment we move towards our next destination which is
 Shri Swami Samarth Math, Bhuigaon,

Shri Swami Samarth Math Bhuigaon

Bhuigaon, a small village blessed to have the presence of shri swami Samarth is Located between Nirmal, famous for the samathi of adhya shankaracharya and girij known as the place of lord dutta or dattatreya in thane district, Maharashtra. 


A holy village totally cut off from the crowd and pollution of the great city Mumbai, in the lap of mother nature, which can rejunavate your mind and body with its natural and serene atmosphere. being close to the seashore,makes it an excellent place for meditation and spiritual activites. 


Located hardly 8 kms from Vasai and Nalasopara rly station makes it a easily accessible place for pilgrims from Mumbai and other places. Shree swami Samarth math, was built by shri Sandeep Mhatre inspired by his father, late shri Yashwant D mhatre, who was also a devotee and follower of data guru. 


From that we move to Datta Tekri A Nice
Datta mandir on Hill gives you a Arial view of Vasai and Arabic Sea,
Datta Mandir on hill of Giriz
then we visit to
Kalam Beach and Nirmal's Ancient Shiv Temple,

Sunset at Kalam Beach
Shankaracharya Math.
Inside View of Shankaracharya Math Nirmal.
 in the afternoon we take a authentic Traditional Pure Vegetation Samvedi Food (Varan, Amti, Val-Papdi, capati and much more)


after lunch brake we visit our Energy Conservation  Center where we get latest information on Solar Energy, Wind Energy, Cost Effective Lighting System,

Shri Jaywant Naik( Mama) Giving information to Visitor Group

Our hall of Environment Information Center
Bio gas Plant, Solar Water Pump, latest Farm equipment's,

after this you can relax at our hall area, we offer you a nice massage on our special massage chair. in this hall we a small presentation will show to you about Shani Mandir and Vasai area History.

Multipurpose Hall
 In the Evening Shani Mandir is fully decorated by Diya's, after enjoying this Awesome Deepotsav

Shani Mandir Deepotsav


We will take a leave from you with hot Tea and coffee and some Hot Snacks. we wish this entire day will become memorable for you and us.

For Information about this package Please Contact Shri Jaywant Naik ( Mama) on Cell No. +91 9011 66 77 88 or +91 98609 42999.


0 comments:

Post a Comment